तुझ्या सावलीत
विसावला जीव
उमले राजीव
चांदण्यात
युगायुगांची रे
मावळे झाकळ
हृदयी उजळ
काही भासे
आकाशाची फुले
शृंगारात रात
आली अंधारात
माझ्याकडे
अंतरीचे गूढ
उकलले धागे
जीवित हो जागे
थरारोनी
धुक्यातून नादे
पैंजणाचा रव
स्वप्नाशांचा नव
जमे मेळा
तुझ्या स्पर्शे झाले
गंजलेले क्षण
सुवर्णाचे कण
जादूगारा !
पाखरांच्या परी
गीत आलापीत
गेले झंकारीत
जीवनास !
जीवनच सारे
मुखरीत झाले
अणुरेणू न्हाले
संगीतात !
आणि आज पुन्हां
अज्ञातात जाशी
उरे माझ्यापाशी
देणगी ही
तर्जनी हो दूर
तरी वीणेवर
राहतील स्वर
रेंगाळत !
: देणगी
: किनारा
: कुसुमाग्रज
विसावला जीव
उमले राजीव
चांदण्यात
युगायुगांची रे
मावळे झाकळ
हृदयी उजळ
काही भासे
आकाशाची फुले
शृंगारात रात
आली अंधारात
माझ्याकडे
अंतरीचे गूढ
उकलले धागे
जीवित हो जागे
थरारोनी
धुक्यातून नादे
पैंजणाचा रव
स्वप्नाशांचा नव
जमे मेळा
तुझ्या स्पर्शे झाले
गंजलेले क्षण
सुवर्णाचे कण
जादूगारा !
पाखरांच्या परी
गीत आलापीत
गेले झंकारीत
जीवनास !
जीवनच सारे
मुखरीत झाले
अणुरेणू न्हाले
संगीतात !
आणि आज पुन्हां
अज्ञातात जाशी
उरे माझ्यापाशी
देणगी ही
तर्जनी हो दूर
तरी वीणेवर
राहतील स्वर
रेंगाळत !
: देणगी
: किनारा
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा