जन म्हणती की -
काट्यावाचून
गुलाब नाही
दिसावयाचा -
एकही काटा या कुसुमाला
कोठे नाही
दलादलांतुनि दहिवर केवळ
साठूनि राही -
म्हणून म्हणतो -
अश्रुवाचून
गुलाब नाही
असावयाचा.
: गुलाब
: हिमरेषा
: कुसुमाग्रज
काट्यावाचून
गुलाब नाही
दिसावयाचा -
एकही काटा या कुसुमाला
कोठे नाही
दलादलांतुनि दहिवर केवळ
साठूनि राही -
म्हणून म्हणतो -
अश्रुवाचून
गुलाब नाही
असावयाचा.
: गुलाब
: हिमरेषा
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा