या प्रेमाला दूरपणाचे
कायमचे वरदान असे
समीपतेचा काच न याला
मलीनतेचा शाप नसे
इथे न केव्हा तुफान उठते
धुसमुसणारे
धुके न पडते अथवा जीवन
आकसणारे
हलके हलके रक्त पिणारा
विद्ध इथे अभिमान नसे
प्रेम असे पण त्या प्रेमासह
जहराचे अनुपान नसे.
: वरदान
: हिमरेषा
: कुसुमाग्रज
कायमचे वरदान असे
समीपतेचा काच न याला
मलीनतेचा शाप नसे
इथे न केव्हा तुफान उठते
धुसमुसणारे
धुके न पडते अथवा जीवन
आकसणारे
हलके हलके रक्त पिणारा
विद्ध इथे अभिमान नसे
प्रेम असे पण त्या प्रेमासह
जहराचे अनुपान नसे.
: वरदान
: हिमरेषा
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा