आषाढाची आठवण
अश्विनाला उरेल का ?
निलातील मेघयात्रा
निरभ्राला स्मरेल का ?
पर्जन्यात हारपली
नक्षत्रांच्या संगे रात
तिची व्यथा हंसपंखी
चांदण्यात कळेल का ?
तिन्ही सांजा धुक्यावर
लिहिलेले दवगीत
त्याचा स्वर प्रकाशाच्या
गर्जनेशी मिळेल का ?
: आशंका
: हिमरेषा
: कुसुमाग्रज
अश्विनाला उरेल का ?
निलातील मेघयात्रा
निरभ्राला स्मरेल का ?
पर्जन्यात हारपली
नक्षत्रांच्या संगे रात
तिची व्यथा हंसपंखी
चांदण्यात कळेल का ?
तिन्ही सांजा धुक्यावर
लिहिलेले दवगीत
त्याचा स्वर प्रकाशाच्या
गर्जनेशी मिळेल का ?
: आशंका
: हिमरेषा
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा