गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे,
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे ||
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो,
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे ||
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो,
सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळू दे ||
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू,
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे ||
आणु दे गा वंचकांना क्रूस छ्द्माचा दयाळा,
रक्त येशूचे परी डोळ्यांत माझ्या साकळू दे ||

-सुरेश भट
Ajun ek jabardasta kaavya, aabhar.
उत्तर द्याहटवा