कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या ! कुणाला काय हो त्याचे ? कुणाला काय सांगाव्या ? उरी या हात ठेवोनी, उरीचा शूल का जाई ? समुद्री चौकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू ! हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा, भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौकडे दावा नदी लंघोनि जे गेले, तयांची हाक ये कानी, इथे हे ओढती मागे, मला बांधोनि पाशांनी कशी साहू पुढे मागे, जिवाला ओढ जी लागे ? तटातट् काळजाचे हे तुटाया लागती धागे पुढे जाऊ ? वळू मागे ? करू मी काय रे देवा ? खडे मारी कुणी, कुणी हसे, कोणी करी हेवा ! | ||
गीत | - | भा. रा. तांबे |
भंगु दे काठिन्य माझे आम्ल जाऊं दे मनींचे; येऊ दे वाणीत माझ्या सूर तूझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य,आणि माझिया अज्ञात टाकी स्फूर्ति-केंद्री त्वद्बियाणे. राहु दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा; अक्षरा आकार तूझ्या फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा. लोभ जीभेचा जळू दे दे थिजु विद्वेष सारा द्रौपदीचे सत्व माझ्या लाभु दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य ’मी’चे दे धरू सर्वांस पोटी; भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्य़ाची कसोटी. खांब दे ईर्ष्येस माझ्या बाळगू तूझ्या तपाचे; नेउं दे तीतून माते शब्द तूझा स्पंदनाचे त्वसृतीचे ओळखू दे माझिया हाता सुकाणू; थोर यत्ना शांति दे गा माझिया वृत्तीत बाणू. आण तूझ्या लालसेची; आण लोकांची अभागी; आणि माझ्या डोळियांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे अन् नम्रता दे पाहण्या जे जे पहाणे वाकुं दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे; घेऊ दे आघात तीते इंद्रियद्वारा जगाचे; पोळू दे आतून तीते गा अतींद्रियार्थांचे आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी; मागण्याला अंत नाही; आणि देणारा मुरारी. काय मागावे परी म्यां तूहि कैसे काय द्यावे; तूच देणारा जिथे अन् तूंच घे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा