कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी चला खेळू आगगाडी, झोका उंच कोण काढी ? बाळू, नीट कडी धर झोका चाले खाली वर ऐका कुकुक् शिट्टी झाली बोगद्यात गाडी आली खडखड भकभक अंधारात लखलख इंजिनाची पहा खोडी बोगद्यात धूर सोडी नका भिऊ थोड्यासाठी लागे कुत्रे भित्यापाठी उजेड तो दूर कसा इवलासा कवडसा नागफणी डावीकडे कोकण ते तळी पडे पाठमोरी आता गाडी वाट मुंबईची काढी खोल दरी उल्लासाची दो डोक्यांचा राजमाची पडे खळाळत पाणी फेसाळल्या दुधावाणी आता जरा वाटे दाटी थंड वारा वरघाटी डावलून माथेरान धावे गाडी सुटे भान तारखांब हे वेगात मागे मागे धावतात तार खाली वर डोले तिच्यावर दोन होले झाडी फिरे मंडलात रूळ संगे धावतात आली मुंबई या जाऊ राणीचा तो बाग पाहू गर्दी झगमग हाटी- कशासाठी ? पोटासाठी ! | ||
गीत | - | माधव ज्यूलियन |
भंगु दे काठिन्य माझे आम्ल जाऊं दे मनींचे; येऊ दे वाणीत माझ्या सूर तूझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य,आणि माझिया अज्ञात टाकी स्फूर्ति-केंद्री त्वद्बियाणे. राहु दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा; अक्षरा आकार तूझ्या फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा. लोभ जीभेचा जळू दे दे थिजु विद्वेष सारा द्रौपदीचे सत्व माझ्या लाभु दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य ’मी’चे दे धरू सर्वांस पोटी; भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्य़ाची कसोटी. खांब दे ईर्ष्येस माझ्या बाळगू तूझ्या तपाचे; नेउं दे तीतून माते शब्द तूझा स्पंदनाचे त्वसृतीचे ओळखू दे माझिया हाता सुकाणू; थोर यत्ना शांति दे गा माझिया वृत्तीत बाणू. आण तूझ्या लालसेची; आण लोकांची अभागी; आणि माझ्या डोळियांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे अन् नम्रता दे पाहण्या जे जे पहाणे वाकुं दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे; घेऊ दे आघात तीते इंद्रियद्वारा जगाचे; पोळू दे आतून तीते गा अतींद्रियार्थांचे आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी; मागण्याला अंत नाही; आणि देणारा मुरारी. काय मागावे परी म्यां तूहि कैसे काय द्यावे; तूच देणारा जिथे अन् तूंच घे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा