किती हळुवार हे न
बोलणे ,
ओथंबून रहाणे अदृष्टांत ,
प्रात्क्नाच्या
वळणावर अबोल टपटपणे
प्राजक्ताच्या
डहाळीसारखे
वाटा खूप असतात
पायांवर कोरलेल्या,
जो तो चालत
असतो अटळपणे;
फारच थोड्यांना दिसतात पण
अबोलपणे सकाळची तरल उन्हे
अंगावर झेलणारी वाटेवरची झाडे
.
फारच थोडे कोणी
जगात असतात
जगणाच्या आतले एक
सूक्ष्म जगणे :
जशी गाण्याच्या आत आत
असते
सूक्ष्म शांतता स्वरांचे गर्भाशय
असणारी .
किती हळुवार हे न
बोलणे ,
ओथंबून रहाणे अदृष्टांत ,
प्रात्क्नाच्या
वळणावर अबोल टपटपणे
प्राजक्ताच्या
डहाळीसारखे
: किती हळुवार
: भटके पक्षी
: मंगेश पाडगावकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा