इथे आलो होतो मागाया
जोगवा
आयुष्याचा ठेवा तुझ्या
दारी
जाईचा मांडवा कारल्याचे
वेल
संसाराची सल कशी
सांगू ?
विधिनिषेधाची झाली
दाटादाटी
मनाची झिंजोटी कोणा
सांगू ?
कशासाठी देवां दयावा
दोष कोणा
आपुला परगणा दुष्काळाचा
असो सोबतीला तुक्याचा
अभंग
हाचि अंगसंग कैवल्याचा
माझी दुबळ्याची होवो
आठवण
कधी सोडवण करा
देवा
: पानझड
: ना. धों .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा