मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर
मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी
वाटा
जशा वाऱ्यान चालल्या
पान्यावर्हल्यारे
लाटा
मन लहरी लहरी
त्याले हाती धरे
कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन
मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप
बरा
त्याले उतारे मन्तर
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू
मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात
मन चप्पय चप्पय
त्याले नही जरा
धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर
मन एव्हड एव्हड
जस खाकसचा दाणा
मन केवढ केवढ?
आभायात बी मायेना
देवां , कसं देलं
मन
आस नही दुनियात
आसा कसा रे
तू यॊगि
काय तुझी करामत
!
देवा आस कस
मन
आस कस रे
घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल!
: बहिणाबाई
चौधरी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा