सारा स्वार्थाचा गलबला
भाऊबंध झाले गोळा
आणि पसार होताना
संसाराचा चोळामोळा
जीवानाची टांगाटोळी
किती सोसू कशी
सोसू ?
डोळे जाळून पापण्या
आता उरले ना
आसू
मळा बहराला यावा
तेव्हा चेकुट काढले
वाळवंटाच्या
वाटांशी
घर मोडीत निघाले
अवघे आयुष्य देतांना
काही राहिले न देवा
तुझ्या अस्तित्वाच्या ठायी
आता देई गा
विसावा
: पानझड
: ना . धों
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा