आठवते प्रेम तुझे :
पूर्ण चंद्र पौर्णिमेचा
तसा तुझा सहवास
झिरीझिरी चांदण्याचा !
चांदण्याची
दुरावण
आहे तशीच
सुंदर;
हृदयाच्या काठावरी
टेकलेली चंद्रकोर !
चंद्रकोरीची
जखम
ताजी सदा
हृदयात ;
उजळते तिच्यातून
क्षीण चांदण्याचे रक्त
!
: चंद्रकोर
: शेला
: इंदिरा संत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा