मालवली
देखता देखतां
डोळ्यापास मिठी धुंदपणे
…
चाळवली
मिटता मिटता
हर्षगर्व दिठी मंदपणे
…
आर्जवाचे
तुटले अंतर
मनामनांतून
संथपणे …
मोकळ्याने
फुलू झुलु झाल्या
रक्तजास्वंदीच्या
कळ्या ऊन ऊन
नग्नपणे … डवरली भोळी भोगतंद्रा
…
अमृताचां डाग पडे
चंद्रा … परी म्यां
पाहिले ,
जहाले दुथडे चुंबनउष्ट्या पापण्यात
मिठ्पानी .
मालवली देखता देखतां डोळ्यापास
मिठी खिन्नपणे …
: डाग पदे चंद्रा
: जोगवा
: आरती प्रभू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा