उतरून आली रात्र
दिवा ठेवी उंबऱ्याशी
जरतारी पायघडी
येणाऱ्याच्या पावलांशी
येतो मिश्कीलसा वारा
टाकी मालवून ज्योत
चांदण्याचे
पाय ज्याचे
त्याला कायसा हा झोत
?
दवे न्हाणीला उंबरा
वर रेखिली रांगोळी
कुंकू- हळदीची तशी
बोटे लाविली कोवळी
आला मिश्किल किरण
वर शिंपतो गुलाल
जडभारी जाते पाय
पंख रंगीत होतील
: उंबरा
: चित्कळा
: इंदिरा संत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा