माझ्यासोबत
समुद्राच्या
खाऱ्या खाऱ्या बाता येतील
मला शोधत जाल
तर
अनेक वळणवाटा येतील
मी जसा आहे
तसा
प्लीज नका पाहू
मला
माझा फोटोच काढाल तर
त्यांत फक्त लाटांच
येतील
अश्रूंमध्ये
मिसळलेल्या
पाण्याच्या
या गाण्याचं
वयासोबत आणखी आणखी
खारट खारट होण्याचं
आभाळाला प्रश्न पडतो
रोज वरून बघताना
वय काय असेल
बरं
समुद्राच्या
पाण्याचं ?
माझ्यासोबत
समुद्राच्या
खाऱ्या खाऱ्या बाता येतील
कधी गॉसिप्स , कधी गप्पां
कधी तुम्हाला गातां येतील
माझ्यामध्ये
भिजायचं तर
किनाऱ्यावर
उभे रहा
जेव्हां भरती येईल
तेव्हां
लाटाच उठून स्वतः
येतील
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा