एक पाऊल घेवून
जावे
त्याचा स्पर्श मातीला
क्षितिजाला
गुंगी …
तरीही अगम्य जरासे माझे
मन
या पूजेत सजून बसलेले
दगडांवर शेवाळ : निसरडी घसरण
जपून ने ना
या मेण्यात
सुखावर फोड आणणारे
काहीतरी …
अभिषेक …
चंद्रमांडातील
कलत्या पाण्याचा
तुझ्यातून दूर …. तुझ्यातून .
: अभिषेक
: सांजभयाच्या
साजणी
: ग्रेस
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा