असे शब्द , असे अर्थ
….
मेघ उदार वाहती
,
माझ्या धूळ-पाचोळ्याला
कस्तुरीचे दान देती
.
अशा शब्दांचे चंदन
कशी भाळावरी लावू ?
चकमकीचे मी फुल
कशी चांदणीशी होऊ
?
असे शब्द असे
अर्थ …
निळे आकाश मंथर
,
माझ्या दीपकळीसाठी
व्हावें शेल्याचे पाखर .
: असे शब्द असे
अर्थ
: चित्कळा
: इंदिरा संत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा