अखेर माझे जीवन
म्हणजे माझे कळणे
तिमिरहि माझा दिवाहि
माझा माझे जळणे
परंतु केव्हा अशा क्षणाला
लाख गवाक्षे भवती खुलली
उचलुनी घेती रस्त्यावरूनी
प्रकाश काही काही
माती
आणि पुन्हा विवरात चालते
जुनेच जळणे
परंतु त्या ज्वलनात
उमलते नवीन कळणे
: अशा क्षणाला
: वादळवेल
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा