लक्ष लक्ष तू
अन लक्ष लक्ष
वेळ …
मी एक अनंताचा
चुकला
लक्ष लक्ष वेळ
तुला
रिकामीच पाठवावे ;
लक्ष लक्ष वेळ
तुला
साठवावे आठवावे
मिठी पडताच तुझी
तुझ्याहून दूर व्हावे
कुण्या बाहुलीचे दुःख
तुझ्या डोळ्यात रचावे
पहाटेच्या कळ्यापाशी
थोडे मागावे इमान
तुला सांगावे तुलाही
माझ्या मनाचे प्रमाण
लक्ष लक्ष तू
अन लक्ष लक्ष
वेळ …
मी एक अनंताचे
चुकले पाऊल
: लक्ष लक्ष
: जोगवा
: आरती प्रभू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा