सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले !
घरातुनी
चोरपावलांनी लपून आले.. जपून आले !
तुझ्याच
स्वप्नात रात गेली…तुझ्याच
स्वप्नात जाग आली…
तुझ्याच
स्वप्नात जागणा~या जगातुनी
मी उठून आले !
विचारले
मी न अंबराला..
विचारले मी न वारियाला …
तुझ्या मिठीचा निरोप आला- मिठीत मी मोहरून आले !
अताच हा दूर तारकांचा
कुठेतरी काफिला निघाला
आताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून आले
गडे मला बोलता न आले, कुणीकुणी बोललेह नाही…
अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले !
सुरेश भट
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा