एकच शर्त की
-
तुटताना रस्ते
वळून मागे
बघायचे नाही
वेगळ्या वाटेची
लाभता पायकी
असते नसते
म्हणायचे नाही
वांझोट्या स्वप्नांचा
उबवीत दर्प
काळजात सर्प
पाळायचा नाही
दिवा हातातील
कोणासाठी कधी
काळोखाच्या
डोही
फेकायचा नाही
: शर्त
: वादळवेल
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा