दोन पोक्त पाने :
एक पीवळगार, दुसरं हिरवं
धम्मक
बाजूबाजूला
. दोघांचे देठ एकत्र
थेट.
एकावरल्या रेषा दुसरं
वाचतंय
स्वतःच्या रेघांतून पसरतंय
पहिल्याच्या
अंगात .
दोनच ती . इतरांतही
अशी एकत्र दोन
कित्येक
वारा आला कि
एकत्र सळसळात सर्वांचा
.
पिवळ्या उन्हांत पोपटी पानं
…
पोक्त झाड उभंच्या
उभं
: आरती प्रभू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा