एक-एक करुनीया
संसार हा मांडलेला
किती सुंदर देखणा
डाव सुघड मांडिला
धातू-काच-लाकडाचे
जाणवें न वस्तुपन
कशी बाळे झोपासली
माय गांधारी होऊन
उंबरा हाओलांडून
राजलक्ष्मी जी येईल
तिच्या चाहुलीने होई
मन उगाच व्याकुळ
सोनसळ्या संसाराची
शीग तिच्या पायापाशी
टाकील का उलटून?
लावील का हृदयाशी?
: गर्भरेशीम
: इंदिरा संत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा