सर्व नद्या, इच्छा असो-नसो,
समुद्राला
मिळतात. त्यांच्या
निमुट आसवांनी सारा समुद्रच
खारट करून टाकलेला.
समुद्र आपल्यासारखाच : दुःखी.
त्याच्या
विव्हळण्याचा
समुद्रगर्जना म्हणून प्रथम
कुणी अधिक्षेप केला?
आवेगाने
किनार्यापर्यंत
वाहत आलेल्या त्याच्या अश्रूंना
भरती कुणी म्हटले आणि
डोळ्यात
जमणारे पाणी मागे
खेचणार्या
निग्रहाला ओहोटी?
कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह
- बरेच काही उगवून आलेले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा