घन जमतिल तेव्हा जमतिल
मोकळे केस तू सोड ;
परसात तुझ्या तरि काय .
निष्पर्ण
सुरूचे खोड
पाऊसपाखरे
जेव्हा
देशांतर
करुनी येतिल ;
मग असे सुखाचे सजणे
मेंदूहुन
रंगीत खोल…
आटल्या नदीच्या पात्री
हा उभा एकटा बगळा ;
घन करुणाघन होताना
वाळूचा भांग कपाळा …
मृगजळी ऊन स्वप्नांचे
हे कलते कलते पसरे ;
पेशीचे तोवर माझ्या
तू माळ वाळले गजरे …
घन जमतिल तेव्हा जमतिल
वार्याचे
अलगुज खोटे ;
हे दु:ख मिठीचे तोवर
हाडांना
घेऊन पेटे.
कवी - ग्रेस
कवितासंग्रह
- चंद्रमाधवीचे प्रदेश
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा