क्षणफुले वाहुनी केले तव पूजन :
त्या निर्माल्याची उदंड हि पखरण .
निर्माल्य जरी हा वास न सरला कसा ;
रसरशीत पाकळीवरल्या तांबूस नसा .
ती फुले वेचते आता वेड्यापरी
अन साठविते ती अंगाराच्या उरी :
लागून आच ती रूपच घेती नवे
पाहून तयांना हसली हि आसवे
नक्षत्रफुले ती आता तुज वाहून
मी चालविते तव अखंड हे पूजन
: नक्षत्रफुले
: शेला
: इंदिरा संत
त्या निर्माल्याची उदंड हि पखरण .
निर्माल्य जरी हा वास न सरला कसा ;
रसरशीत पाकळीवरल्या तांबूस नसा .
ती फुले वेचते आता वेड्यापरी
अन साठविते ती अंगाराच्या उरी :
लागून आच ती रूपच घेती नवे
पाहून तयांना हसली हि आसवे
नक्षत्रफुले ती आता तुज वाहून
मी चालविते तव अखंड हे पूजन
: नक्षत्रफुले
: शेला
: इंदिरा संत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा