होता धरा ही पारखी
जावे नभा , कोणाकडे
तुझिया घरात वत्सला ,
हृदयात सांत्वन सापडे .
होती कथा तुज माहिती
होते इशारे तू दिले
निलार्त लोचन तेधवा
होते तुझे पाणावले
थोरीव की ना बोलता
ओढून घेसी तू उरी
देशी उसे ज्वलनास या
त्या चंदनी चंद्रावरी .
: आकाश
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
जावे नभा , कोणाकडे
तुझिया घरात वत्सला ,
हृदयात सांत्वन सापडे .
होती कथा तुज माहिती
होते इशारे तू दिले
निलार्त लोचन तेधवा
होते तुझे पाणावले
थोरीव की ना बोलता
ओढून घेसी तू उरी
देशी उसे ज्वलनास या
त्या चंदनी चंद्रावरी .
: आकाश
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा