चोराच्या कपाळावर
वेश्येच्या स्तनावर
मवाल्याच्या मनगटावर
केव्हा
मी वाचले शिलालेख
नितळ महात्मेचे
आणि केव्हा वाचले
सज्जनांच्या स्मितावर
साधुसंतांच्या कफन्यांवर
सचिवांच्या फायलींवर
ताजे कलम
वेश्यावृतेचे ,
मावालेगीरीचे ,
चोरपणाचे .
तात्पर्य :
संज्ञा स्थिर असल्या
तरी प्रवृत्ती प्रवाही आहे
: तात्पर्य
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
वेश्येच्या स्तनावर
मवाल्याच्या मनगटावर
केव्हा
मी वाचले शिलालेख
नितळ महात्मेचे
आणि केव्हा वाचले
सज्जनांच्या स्मितावर
साधुसंतांच्या कफन्यांवर
सचिवांच्या फायलींवर
ताजे कलम
वेश्यावृतेचे ,
मावालेगीरीचे ,
चोरपणाचे .
तात्पर्य :
संज्ञा स्थिर असल्या
तरी प्रवृत्ती प्रवाही आहे
: तात्पर्य
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा