ऐल तटावर
पैल तटावर
दोन पाखरे नदीकिनारी
दोघांच्याही
उरामध्ये शर
मारुनी गेला कुणी शिकारी
त्या जखमांची
आर्त वेदना
शब्द फेकते गगनावरती
त्या शब्दातून
ओळख पटली
युगे युगे जी मिटली होती .
मावळतीला
मेघ पेटले
ओसरीवर फुटले जाग्रण
जीवनातल्या
सांध्य क्षणांना
अवचित कळले जीवितकारण .
विसकटलेले
पंख उसळले
हवेत दुखली एक विराणी
आणि नदीच्या
अथांगतेचे
मौन उसवले दोन ठिकाणी
: विराणी
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
पैल तटावर
दोन पाखरे नदीकिनारी
दोघांच्याही
उरामध्ये शर
मारुनी गेला कुणी शिकारी
त्या जखमांची
आर्त वेदना
शब्द फेकते गगनावरती
त्या शब्दातून
ओळख पटली
युगे युगे जी मिटली होती .
मावळतीला
मेघ पेटले
ओसरीवर फुटले जाग्रण
जीवनातल्या
सांध्य क्षणांना
अवचित कळले जीवितकारण .
विसकटलेले
पंख उसळले
हवेत दुखली एक विराणी
आणि नदीच्या
अथांगतेचे
मौन उसवले दोन ठिकाणी
: विराणी
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा