माझं मराठीपण
मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात
संतांच्या शब्दांत
इतिहासाच्या पानांत ,
तेव्हां सारीजण हसून म्हणाली ,
आम्ही शोधलं
आमचं मराठीपण
या भूमीवरील माणसांच्या मनात
त्यांच्या जखमांत , त्यांच्या रक्तात
ज्यातून उसासतात
सूर्याचे किरण
मराठीपण ओलांडून साऱ्या आकाशाला
गवसणी घालणारे
: मराठीपण
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात
संतांच्या शब्दांत
इतिहासाच्या पानांत ,
तेव्हां सारीजण हसून म्हणाली ,
आम्ही शोधलं
आमचं मराठीपण
या भूमीवरील माणसांच्या मनात
त्यांच्या जखमांत , त्यांच्या रक्तात
ज्यातून उसासतात
सूर्याचे किरण
मराठीपण ओलांडून साऱ्या आकाशाला
गवसणी घालणारे
: मराठीपण
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा