अशी हटाची
अशी तटाची
उजाड भाषा
हवी कशाला
स्वप्नांचे नव
गेंद गुलाबी
अजून फुलती
तुझ्या उशाला .
अशीच असते
यौवनयात्रा
शूल व्यथांचे
उरी वहावे
जळत्या जखमा-
वरी स्मितांचे
गुलाबपाणी
शिंपित जावे
जखमां द्याव्या
जखमां घ्याव्या
पण रामायण
कशाश त्याचे
अटळ मुलाखत
जर अग्नीशी
कशाश कीर्तन
असे धुराचे
उद्याद्रीवर
लक्ष उद्यांची
पहाट मंथर
जागत आहे
तुझ्याचसाठी
लाख रवींचे
गर्भ सुखाने
साहत आहे
: यौवन
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
अशी तटाची
उजाड भाषा
हवी कशाला
स्वप्नांचे नव
गेंद गुलाबी
अजून फुलती
तुझ्या उशाला .
अशीच असते
यौवनयात्रा
शूल व्यथांचे
उरी वहावे
जळत्या जखमा-
वरी स्मितांचे
गुलाबपाणी
शिंपित जावे
जखमां द्याव्या
जखमां घ्याव्या
पण रामायण
कशाश त्याचे
अटळ मुलाखत
जर अग्नीशी
कशाश कीर्तन
असे धुराचे
उद्याद्रीवर
लक्ष उद्यांची
पहाट मंथर
जागत आहे
तुझ्याचसाठी
लाख रवींचे
गर्भ सुखाने
साहत आहे
: यौवन
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा