जर असेल व्हायचे
कधी आपुले मीलन
त्यात नसावी परीक्षा
त्यांत नसावे बंधन
त्यांत नसावी आसवे
त्यांत नसावा उन्माद
जीवकोषात भरावा
मुक्त मधुर आनंद
जर असेल व्हायचे
कधी आपुले मीलन
त्यांत नसावे रिकाम्या
गोड शब्दांचे नर्तन !
कशा लावाव्या मशाली
पूर्ण चंद्राच्या शोधास
जिथे भक्तीचा सोहळा
काय शब्दांची मिरास ?
मुग्ध कळीच्या पाकळ्या
मुकेपणात फुलती
सांध्य रंगांचे प्रवाह
सातगंगेत वाहती.
जर असेल व्हायचे
कधी आपुले मीलन
अशा प्रशांत शांतीत
व्हावे विलीन होऊन !
दहा दिशांच्या देवता
उभ्या अचल नीरव
पडे थिजून चंद्राचे
भूमिवरती मार्दव .
वारा थांबला वाटेत
तारा देखत राहिल्या
झाडांखालती लपून
उभ्या असती सावल्या !
अशा निर्भय एकांती
खुण प्रीतीची पटावी
दोघांमधील दूरता
युगायुगांची फिटावी
: मीलन
: मराठी माती
: कुसुमाग्रज
कधी आपुले मीलन
त्यात नसावी परीक्षा
त्यांत नसावे बंधन
त्यांत नसावी आसवे
त्यांत नसावा उन्माद
जीवकोषात भरावा
मुक्त मधुर आनंद
जर असेल व्हायचे
कधी आपुले मीलन
त्यांत नसावे रिकाम्या
गोड शब्दांचे नर्तन !
कशा लावाव्या मशाली
पूर्ण चंद्राच्या शोधास
जिथे भक्तीचा सोहळा
काय शब्दांची मिरास ?
मुग्ध कळीच्या पाकळ्या
मुकेपणात फुलती
सांध्य रंगांचे प्रवाह
सातगंगेत वाहती.
जर असेल व्हायचे
कधी आपुले मीलन
अशा प्रशांत शांतीत
व्हावे विलीन होऊन !
दहा दिशांच्या देवता
उभ्या अचल नीरव
पडे थिजून चंद्राचे
भूमिवरती मार्दव .
वारा थांबला वाटेत
तारा देखत राहिल्या
झाडांखालती लपून
उभ्या असती सावल्या !
अशा निर्भय एकांती
खुण प्रीतीची पटावी
दोघांमधील दूरता
युगायुगांची फिटावी
: मीलन
: मराठी माती
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा