काही रंग नवे...
काही तसेच जुने
जयपुरचा गुलाबी, कुरुक्षेत्राचा रक्तलाल
मुंबईचा चंदेरी, पुण्याचा गुलाली
मांदार
मथुरेचा श्यामल, पंजाबचा गव्हाळ
कश्मीरचा रक्तरंजित, बंगळुरचा रेताळ
गोव्याच्या
निळसर, आग्र्याचा संगमवरी
हिमालयाचा धवल, चारीधामचा
धुपसिक्त
कोल्हापुरचा
तांबडा, शिमल्याचा हिरवा
केरळचा शहाळी, गयेचा कषाय
खांडववनाचा
धगधगता, झाशीचा वादळी
काही झाले फिके...
काही झाले दाट
काळाच्या फुलपाखराला माझा सलाम!
: बी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा