काय खावे काही
कळत नाही
वजन माझे वाढत
नाही;
सुपं पिणार्यांचे कळेना
वजन कसे उतरत
नाही!!!!
पाच किलोचा पिल्सबरी
पंधरा दिवस पुरत
नाही
पातेलंभर डाळभाजी
चमचाभर उरत नाही!
बालपणीचे छायाचित्र
जुने मुळीच वाटत नाही;
शाळेतील मित्र मात्र
ओळखायला येत नाही!!!!
मुस्तफातील
काचणार्या बॅगा
पेलता पेलत नाही,
तरी
Wet-Market मधील
भाज्यांचा
मोह काही आवरत
नाही!
गाठोड्यातील
जुने कपडे
अंगात कधी दाटले
नाही
शिंप्याच्या
वहीतले माप
वीस वर्षात बदलले नाही!
ताई म्हणते चर्तुभूज हो
एका हातानी 'ती' भरवेल
दुसर्या हातानी तू खाशील
वेईंग मशीनचे काटे
एकदम टोकाला पोचतील!
: बी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा