तुझे नितळ नाजूक
गीत आले हे कुठून
परीप्रमाणे कोणत्या
फुलामधून उठून !
तुझ्या अक्षर पाकळ्या
दवमालेत भिजल्या
सांध्यघनाच्या कणिका
कानामात्रेत थिजल्या !
कुठे पुनवचांदणे
दऱ्याखोऱ्यात खेळले
त्याच्या फेनाचे तुषार
तुझ्या शब्दात माळले !
कुठे वेलीच्या जाळीत
जळ उन्हांत हालते
त्याच्या लीलांचे लालित्य
तुझ्या ओळीत वहाते !
तुझ्या गीतांच्या पंखांना
सात रंगांचे सिंचन
आले ओलेते पाखरू
इंद्रधनुष्याखालून !
तुझ्या गीतांची संगती
आला श्रावण समोर
माझ्या वैशाख -चैत्रात
झाले हिरवे काहूर !
: तुझे गीत
: मराठी माती
: कुसुमाग्रज
गीत आले हे कुठून
परीप्रमाणे कोणत्या
फुलामधून उठून !
तुझ्या अक्षर पाकळ्या
दवमालेत भिजल्या
सांध्यघनाच्या कणिका
कानामात्रेत थिजल्या !
कुठे पुनवचांदणे
दऱ्याखोऱ्यात खेळले
त्याच्या फेनाचे तुषार
तुझ्या शब्दात माळले !
कुठे वेलीच्या जाळीत
जळ उन्हांत हालते
त्याच्या लीलांचे लालित्य
तुझ्या ओळीत वहाते !
तुझ्या गीतांच्या पंखांना
सात रंगांचे सिंचन
आले ओलेते पाखरू
इंद्रधनुष्याखालून !
तुझ्या गीतांची संगती
आला श्रावण समोर
माझ्या वैशाख -चैत्रात
झाले हिरवे काहूर !
: तुझे गीत
: मराठी माती
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा