तुझ्या माझ्या संसारात
नाही अर्थ नाही मेळ
काळोखाच्या माळावर
चाले ठिणग्यांचा खेळ !
येतो गाजत वाजत
कधी अक्षरांचा जत्रा
लपे आडोश्याला दूर
मान लववूनी व्यथा
केव्हां कलगी तुऱ्यांचे
जाबसवाल रंगती
त्यांच्या कर्कश नादात
अर्थ लाजरे लोपती
यांतूनही जाणवे जे
त्याचा दिलासा मनात
पूर्णाकारासाठी पण
निराकार हे उदास !
: अव्यक्त
: मराठी माती
: कुसुमाग्रज
नाही अर्थ नाही मेळ
काळोखाच्या माळावर
चाले ठिणग्यांचा खेळ !
येतो गाजत वाजत
कधी अक्षरांचा जत्रा
लपे आडोश्याला दूर
मान लववूनी व्यथा
केव्हां कलगी तुऱ्यांचे
जाबसवाल रंगती
त्यांच्या कर्कश नादात
अर्थ लाजरे लोपती
यांतूनही जाणवे जे
त्याचा दिलासा मनात
पूर्णाकारासाठी पण
निराकार हे उदास !
: अव्यक्त
: मराठी माती
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा