तुझ्या पापण्यांच्या आत
काय साठले दाटले
दोन ओठांच्या दलात
दव कोणते गोठले !
उपचाराचे बोलणे
मध्ये तुटून थांबले
क्षण अशब्द रिकामे
युगाप्रमाणे लांबले
नेत्र मिळाले नेत्रास
नीट केलेस कुंतल
जरा कापत्या कराने
घेसी ओढून अंचल
गोंधळलेल्या गालावरी
स्मित उमले अधुरे
शब्द डोकावती काही
ओठामधून घाबरे
उभे संकोचाच्या आड
त्याची दिसली सावली
लाल रंगत उषेची
मेघामध्ये न मावली .
नको सांगूस काहीही
काय सांगायचे आहे
अशा भाव-मोहनाचा
अंत अक्षरांत राहे .
: अशब्द
: मराठी माती
: कुसुमाग्रज
काय साठले दाटले
दोन ओठांच्या दलात
दव कोणते गोठले !
उपचाराचे बोलणे
मध्ये तुटून थांबले
क्षण अशब्द रिकामे
युगाप्रमाणे लांबले
नेत्र मिळाले नेत्रास
नीट केलेस कुंतल
जरा कापत्या कराने
घेसी ओढून अंचल
गोंधळलेल्या गालावरी
स्मित उमले अधुरे
शब्द डोकावती काही
ओठामधून घाबरे
उभे संकोचाच्या आड
त्याची दिसली सावली
लाल रंगत उषेची
मेघामध्ये न मावली .
नको सांगूस काहीही
काय सांगायचे आहे
अशा भाव-मोहनाचा
अंत अक्षरांत राहे .
: अशब्द
: मराठी माती
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा