माझे मन तूझे
झाले
तुझे मन माझे
झाले
माझे प्राण तूझे प्राण
उरले ना वेगळाले
॥
मला लागे तुझी
आस
तुला जडे माझा
ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती
भास ॥
माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तूझ्यामाझ्यातले
सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी ॥
तुझी माझी पटे
खूण
तुझी माझी हीच
धून
तूझे प्राण माझे प्राण
माझे मन तूझे
मन ॥
: सुधीर मोघे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा