काय म्हणता..?
अहो खरंच,
त्याचं-तिचं आज
break-up झालंय…
तुझ्याशिवाय
जगणं अन्
मरणंहि नाही,
असलं काहिसं
दोघंहि म्हणायची,,
नको-नको असतांनाही
एकमेकांना तरी बरंच
झेललंय,
त्याचं-तिचं आज
break-up झालंय…
प्रेमाचे भास असतील
कदाचित सारे
गोंडस अशा या
नात्यातलं
प्रेम पूर्णपणे उतू गेलंय,
त्याचं-तिचं आज
break-up झालंय…
खरं प्रेम lifetime असतं,
आज आहे अन्
उद्या नाही
असं त्यात कधीच नसतं,,
एकमेकांच्या
विश्वासाचं
फूलपाखरू कधीच उडून
गेलंय,
त्याचं-तिचं आज
break-up झालंय…
तो म्हणतो ती अशीच
आहे,
ती म्हणते तोही तसाच
आहे,,
सारं काहि असं-तसंच असेल
तर सोबतीचा तुमचा आग्रह
का आहे..?
दोघांचं मन एकमेकांसाठी
यापुर्वीच आत्महत्या करून मेलंय,
त्याचं-तिचं आज
break-up झालंय…
काय वाटलं असेल कुणास
ठावुक
पण मनाच्या मृत्यूनंतरच्या
अंत्यसंस्काराचं
काम मात्र
दोघांनीही यथासांग केलंय,
त्याचं-तिचं आज
break-up झालंय…
ती-तिचा नवरा
तो अन् त्याची
बायको
चौघांमध्येही
तो मात्र तिची
उगाच अशी छेड़
काढणार,
पण गैरसमज नको हं…
कारण, त्याचं-तिचं आज
नाही
ब-याच वर्षांपूर्वी
break-up झालंय…
: सौमित्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा