एकला उजाड माळ
छातीस उन्हाचे तडे
अधीर नेत्रांनी राही
पहात आकाशाकडे
शामल स्नेहल वर्षा
पातली दूरच्या नभी
मेघांनी दुमदुमी नादे
रत्नांची कमान उभी
अपेक्षा थरारे उरी
शीतल समीरासवे
सहस्त्र पाउसधारा
देतील जीवन नवे !
वर्षेचे जांभळे ध्वज
दिसले क्षितीजावरी
सावळ्या मांडवामध्ये
नाचली चंदेरी परी
अखेरी अंबर भरे
येई तो सुवर्ण क्षण
आशेने कातर झाले
माळाचे जळके क्षण
हन्त ते सावळे स्वप्न
तसेच विरून गेले
सौभाग्य दुरून जाई
आकाश नीरभ्र झाले!
सांत्वन माळास एक
पर्जन्य येथे न पडे
पडो न - परंतु छाया
लाभली , हे हि न थोडे !
: छाया
: मराठी माती
: कुसुमाग्रज
छातीस उन्हाचे तडे
अधीर नेत्रांनी राही
पहात आकाशाकडे
शामल स्नेहल वर्षा
पातली दूरच्या नभी
मेघांनी दुमदुमी नादे
रत्नांची कमान उभी
अपेक्षा थरारे उरी
शीतल समीरासवे
सहस्त्र पाउसधारा
देतील जीवन नवे !
वर्षेचे जांभळे ध्वज
दिसले क्षितीजावरी
सावळ्या मांडवामध्ये
नाचली चंदेरी परी
अखेरी अंबर भरे
येई तो सुवर्ण क्षण
आशेने कातर झाले
माळाचे जळके क्षण
हन्त ते सावळे स्वप्न
तसेच विरून गेले
सौभाग्य दुरून जाई
आकाश नीरभ्र झाले!
सांत्वन माळास एक
पर्जन्य येथे न पडे
पडो न - परंतु छाया
लाभली , हे हि न थोडे !
: छाया
: मराठी माती
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा