काय आहे मेंदू ? | मेंदू विचारतो |
मेंदूच शोधतो | मेंदूला या ||
मेंदूतच आहे | दडले उत्तर |
नाही सापडत | मेंदूलाच ||
मेंदूलाच मेंदू | अनोळखी असा |
देहातून जसा | आत्माराम ||
‘संदू’ म्हणे मेंदू | पुरा वैतागला |
फुका शिणवला | जन्मभर ||
: मौनाची भाषांतरे, संदीप खरे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा