पणतूची लो-वेस्ट
जीन्स
गुडघ्यावर फाटलेली
मागूनही फाटकेली
कमरेखाली चाललेली
गणपतीची सोंड
दंडावर गोंदलेली
भुवईत त्याच्या
भिकबाळी अडकवलेली
कानात त्याच्या
वायरी खोचलेल्या
सदरा त्याचा
नाभीपर्यंतच
शिवलेला
'ही कंची बाई
फॅशन'
नऊवारीतली पणजी
बुचकळ्यात पडलेली!!!
पणतीच्या केसांना
निळा-जांभळा कलप
बेलीबटनात तिच्या
डुल पीअर्सलेला
पोलक्याच्या
बाह्या
गळ्यासकट कापलेल्या
करातले ब्रेसलेट्स
निसटत चाललेले
एका पायातले पैजण
नेहमीच हरवलेले
कटीभोवती विंचवाच्या
नांग्या काढलेल्या
पायतल्या वहाणा
हातभर उंचावलेल्या
'काय बाई हा
ताल'
पणजी काळजीत पडलेली
पिढीपिढीतला
बदल
पणजीला पहावेना
घरादारात तिचे
कुणी आता ऐकेना
कानांना तिच्या
जॅझ साहवेना
पणतवंडापुढे
तिला बसवेना
बिचारी पणजी
करुणा भाकते
'ने मज ने'
तुझ्या घरी
देवाला रोज म्हणते!!!
: बी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा