कोठून कुठे आलास खगा,
केलेस मनोहर कूजन रे
ती रुमझुमता तव नाद्फुले
हे पुलकित झाले निर्जन रे !
जो दिव्य प्रकाश इथे न दिसे
जो पैलतटावर दूर वसे
चोचीत तयांचे किरण तुवां
हे दान दिले मज , वाहून रे !
क्षण निर्घृणता ही गहिवरली
क्षण नीरवता ही थरथरली
ती नास्तिकता निखळून पडे
हृदयात नीनादे पूजन रे !
जातोस अतां जा , स्वप्न सरे
जो भास प्रदीप्त तमास विरे
या जीवन-घटकेवरी तुझे
हो नांव चिरंतन मुद्रित रे !
: कोठून कुठे
: मराठी माती
: कुसुमाग्रज
केलेस मनोहर कूजन रे
ती रुमझुमता तव नाद्फुले
हे पुलकित झाले निर्जन रे !
जो दिव्य प्रकाश इथे न दिसे
जो पैलतटावर दूर वसे
चोचीत तयांचे किरण तुवां
हे दान दिले मज , वाहून रे !
क्षण निर्घृणता ही गहिवरली
क्षण नीरवता ही थरथरली
ती नास्तिकता निखळून पडे
हृदयात नीनादे पूजन रे !
जातोस अतां जा , स्वप्न सरे
जो भास प्रदीप्त तमास विरे
या जीवन-घटकेवरी तुझे
हो नांव चिरंतन मुद्रित रे !
: कोठून कुठे
: मराठी माती
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा